अग्रलेख .... चला, विविधतेतील एकतेचा उत्सव साजरा करूया
राष्ट्रीय एकता दिन हा केवळ ऐतिहासिक व्यक्तीच्या स्मरणापुरता मर्यादित नसून देशाची एकता टिकवून ठेवणे आणि सामाजिक सलोखा वाढवणे याचे स्मरण देणारा दिवस आहे.
दरवर्षी ३१ ऑक्टोबर हा दिवस भारतात राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी पाळला जातो. स्वांतत्र्यानंतर भारताच्या एकत्रीकरणामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. देशाची एकता टिकवणे आणि सामाजिक सलोखा वाढवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
विविधतेचा नाश करून एकरूपता निर्माण करणे हा एकतेचा मार्ग नाही; उलट विविधतेचे जतन करून समान राष्ट्रीय भावना विकसित करणे हा खरा एकात्मतेचा आधार आहे. भारतीय संविधान हे राष्ट्रीय एकतेचे सर्वांत महत्त्वाचे अधिष्ठान असून त्यात स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा समावेश आहे.
