राजवडी येथे पुणे-सोलापूर महामार्गावरील उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळला; एकाचा मृत्यू, एक जखमी
इंदापूर तालुक्यातील राजवडी येथे पुणे-सोलापूर महामार्गावरील उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळून एका मजुराचा मृत्यू झाला तर एक मजूर गंभीर जखमी झाला.

पुणे : इंदापूर तालुक्यातील मौजे राजवडी येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाजवळ साइडपट्टीच्या भरावाचे काम सुरू असताना माती-मुरुमाचा ढिगारा कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला असून, एक मजूर जखमी झाला आहे. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ही दुर्घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, एनएचएआय आणि महसूल विभागाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य राबवले. जखमी मजुरावर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
