आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पुणे जिल्ह्यात पीएम किसान योजनेतून १,९३७ कोटींचा लाभ; ४.३४ लाख शेतकरी पात्र; २४ व्या हप्त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण

    पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४.३४ लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २४ व्या हप्त्याचे ऑनलाइन वितरण करण्यात आले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · ३१ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत १ हजार ९३७ कोटी रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये सुमारे ४.३४ लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. गुजरात मधील बनासकांठा येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २४ व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले.

    या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती लावली. योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपये तीन समान हप्त्यांत थेट बँक खात्यात जमा केले जातात.