दिवाळीत खासगी बसकडून निर्धारित भाड्यापेक्षा अधिक आकारणी केल्यास कारवाई, प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विशेष तपासणी मोहीम
दिवाळीच्या काळात खासगी बसमालकांनी निर्धारित भाड्यापेक्षा जास्त रक्कम आकारल्यास आरटीओकडून २० नोव्हेंबरपर्यंत विशेष तपासणी मोहीम राबवून कडक कारवाई केली जाईल.
पुणे : दिवाळीच्या कालावधीत खासगी प्रवासी बसमालकांनी शासनाने निश्चित केलेल्या मर्यादांपेक्षा अधिक भाडे आकारू नये. निर्धारित भाड्यापेक्षा अधिक आकारणी करणाऱ्या बसमालकांविरुद्ध मोटर वाहन कायदा व नियमांनुसार कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिला आहे.
यासाठी २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. प्रवाशांनी अधिक भाडे आकारणी किंवा इतर नियमभंग आढळल्यास आरटीओच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा ई-मेलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
