अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी आराखडा सादर, दुष्काळ व पाणीटंचाईची शक्यता असलेल्या भागात जलसंधारण कामांना गति
पुणे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी आराखडा तयार करून सादर केला आहे.
पुणे : टंचाईग्रस्त व दुष्काळी भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती आणि उपलब्ध जलसाठ्यांचा तांत्रिक अभ्यास करून केवळ तात्पुरती टँकर मुक्ती न करता गावांना शाश्वत जलसमृद्धीकडे घेऊन जाणारा आराखडा जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडून तयार करण्यात आला आहे.
पाझर तलाव व बंधाऱ्यांची दुरुस्ती करून उपलब्ध पाणीसाठा आणि सिंचन क्षमता पुनरस्थापित करण्याचा उद्देश आहे. या अभियानांतर्गत २११ कामे प्रस्तावित आहेत.
