आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    एचडीएफसी लाइफच्या 'स्वाभिमान' उपक्रमातून पुण्यात सामाजिक व पर्यावरणीय विकासाला चालना, पुणे सेंट्रलसह शहरात 'सिटी फॉरेस्ट्स'द्वारे हरित क्षेत्राचा विस्तार

    एचडीएफसी लाइफने सीएसआर उपक्रम 'स्वाभिमान' अंतर्गत पुण्यात नाशिक, छत्रपती संभाजीनगर व जालन्यामध्ये शंभरहून अधिक नागरी वने विकसित केली आहेत.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · ३१ ऑक्टोबर २०२६

    पुणे : एचडीएफसी लाइफने कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) 'स्वाभिमान' उपक्रमातून पुण्यासह राज्यात विविध उपक्रम राबवले आहेत. कंपनीने गेल्या पाच वर्षांत २०.७३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, ४८ प्रकल्पांच्या माध्यमातून ३ लाख ४१ हजार १८४ हून अधिक नागरिकांना लाभ पोहोचवला आहे.

    पुण्यातील नागरी हरित क्षेत्राचा विस्तार, शिक्षण आणि समुदाय विकासावर या उपक्रमांतर्गत विशेष भर देण्यात आला आहे. तसेच आरोग्य आणि स्वच्छतेसाठी ६.४९ कोटींचा खर्च करण्यात आला आहे.