आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पुणे ग्रोथ हबच्या विकास आराखड्याचा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून आढावा

    पुणे महानगर प्रदेशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या 'पुणे ग्रोथ हब' उपक्रमाच्या विकास आराखड्याचा आढावा उपमुख्यमंत्री व पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · ३१ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे महानगर प्रदेशाचा सर्वांगीण विकास करून पुण्याला जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनवण्याच्या उद्देशाने राबवण्यात येत असलेल्या 'पुणे ग्रोथ हब' उपक्रमाच्या विकास आराखड्याचा आढावा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.

    या बैठकीस माजी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. येत्या नोव्हेंबरअखेर पुणे ग्रोथ हबचा बृहद् विकास आराखडा शासनाकडे सादर करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात ५ हजार कोटींचा निधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.