आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेमध्ये कोट्यवधींच्या विविध विकासकामांना मंजुरी

    पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील रस्ते, ड्रेनेज, आरोग्य व ई-लर्निंग सुविधांच्या विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · ३१ ऑक्टोबर २०२६

    पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा नुकतीच महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये पार पडली. या सभेमध्ये शहरातील विविध प्रभाग आणि परिसरातील रस्ते विकास, दुरुस्ती, आरोग्य व नागरी सुविधांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.

    सुदर्शननगर येथे आरोग्य क्लब दुरुस्ती, स्ट्रीट लाइट विद्युत पुरवठा, तसेच विविध प्रभागांतील रस्ते दुरुस्ती, डांबरीकरण, ड्रेनेज व स्वच्छतागृहांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे शहरातील नागरी सुविधा बळकट होण्यास मदत होणार आहे.