महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी टाटा कॅपिटलचे सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
टाटा कॅपिटलने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून राबवलेले उपक्रम महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाला गती देणारे ठरतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई : महाराष्ट्राच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी शासनासोबत उद्योग क्षेत्राचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रात टाटा कॅपिटलने राबवलेल उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
गेल्या पाच वर्षांत कंपनीने साडेपाच लाखांहून अधिक नागरिकांना लाभ पोहोचवला आहे. कौशल्य विकासातून रोजगाराच्या संधी, आरोग्य सेवा आणि सौरऊर्जेचा वापर यातून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होणार आहे.
