आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे देशातील प्रमुख केंद्र बनणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    इलेक्ट्रिक वाहन निर्मितीच्या क्षेत्रात महाराष्ट्र वेगाने पुढे जात असून, महाराष्ट्र देशातील प्रमुख ईव्ही हब बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · ३१ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुण्यात ईका मोबिलिटी आणि फिनर्क्ल समूहाच्या नव्या उत्पादन सुविधांच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. ईव्ही उद्योगाची महत्त्वाची केंद्रे महाराष्ट्रात साकार होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

    येत्या ५ वर्षांत महाराष्ट्रात ५० हजार इलेक्ट्रिक बसची आवश्यकता असून, स्थानिक पातळीवर उत्पादन क्षमता वाढवावी असे आवाहन करण्यात आले. यामुळे प्रदूषण कमी होण्यासोबतच मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.