आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    देश-विदेश

    पंजाब निवडणुकीपूर्वी 'आप'ला मोठा धक्का,तीन आमदारांचा पक्षाला रामराम

    पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाच्या तीन आमदारांनी पक्षाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २ नोव्हेंबर २०२६

    अमृतसर : २०२७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला (आप) मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या तीन आमदारांनी दोन दिवसांत राजीनामा दिला असून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

    अमृतसर उत्तरचे आमदार आणि माजी आयपीएस अधिकारी कुंवर विजय प्रताप सिंह यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. भगवंत मान सरकार आणि आप नेतृत्वाशी दीर्घकाळापासून त्यांचे मतभेद होते. सरकार चालवण्याच्या पद्धतीवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते.

    त्याआधी पतियाळा जिल्ह्यातील समानाचे आमदार चेतन सिंग जोडमाजरा आणि सनावरचे आमदार हरमीत सिंग पठाणमाजरा यांनीही आपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला.