आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    बांधिलकी:राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस

    राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आपल्या एका महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला सुपूर्द केले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २ नोव्हेंबर २०२६

    छत्रपती संभाजीनगर : राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शेतकऱ्यांप्रती आपली बांधिलकी जपत राज्यातील दुष्काळी उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस आपले एक महिन्याचे वेतन मदत म्हणून दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी मदतीचा धनादेश सुपूर्द केला.

    मुख्यमंत्री फडणवीस छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले असताना राज्यपालांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी राज्यपाल बागडे यांनी आपले वेतन दुष्काळ मदतीसाठी दिले.

    या प्रसंगी इतर बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, आमदार सुहास शिरसाट आणि इतर लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.