राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याला पुन्हा मंत्रिपद मिळणार, अमित शाह यांची घेतली भेट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका माजी मंत्र्यांचा लवकरच मंत्रिमंडळात समावेश होणार असून त्यांनी आणि एका वरिष्ठ मंत्र्याने नुकतीच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका माजी मंत्र्यांचे लवकरच मंत्रिमंडळात पुनरागमन होणार आहे. पक्षातील एका माजी मंत्र्याने आणि एका वरिष्ठ मंत्र्याने नुकतीच दिल्लीत महायुतीतील श्रेष्ठींची भेट घेतली. रविवारी रात्री दिल्लीत ही भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाने संबंधित मंत्र्यांच्या पुनरागमनाला ग्रीन सिग्नल दिल्यानंतर त्या माजी मंत्र्याने दिल्लीत भाजप श्रेष्ठींची भेट घेतली. सुनेत्रा पवार यांच्याकडे असलेल्या अतिरिक्त खात्याची जबाबदारी संबंधित मंत्र्याला दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. आज संध्याकाळी पक्षाच्या कोर कमिटीची बैठक होणार असून त्यात यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
