आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    हडपसर-मांजरी प्रभागात २२ गुणवंत विद्यार्थी, ४५ मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान

    पुणे महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने हडपसर-मांजरी प्रभागातील गुणवंत विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २ नोव्हेंबर २०२६

    पुणे : पुणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने हडपसर-मांजरी प्रभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या २२ गुणवंत विद्यार्थ्यांचा व ४५ शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

    के. रामचंद्र आप्पा बनकर इंग्रजी माध्यम विद्यालयात हा सोहळा पार पडला. इयत्ता चौथी, पाचवी, सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

    विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणे आणि शिक्षकांच्या योगदानाची दखल घेणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.