स्मार्टवर्क्सच्या आर्थिक निकालांतून विस्ताराची दिशा स्पष्ट
स्मार्टवर्क्स कोवर्किंग स्पेसने आर्थिक वर्ष २०२७ च्या दुसऱ्या तिमाहीत महसूल आणि नफ्यात लक्षणीय वाढ नोंदवली आहे.
पुणे : स्मार्टवर्क्स कोवर्किंग स्पेसने आर्थिक वर्ष २०२७ च्या दुसऱ्या तिमाहीत उत्पन्न आणि नफ्यात लक्षणीय वाढ नोंदवली आहे. कंपनीचे परिचालन उत्पन्न वार्षिक तुलनेत ३९ टक्क्यांनी वाढून ५९१ कोटी रुपये झाले आहे.
करपश्चात समायोजित नफ्यात १३६ टक्क्यांची वाढ झाली असून तो सुमारे ४३.४ कोटी रुपये झाला आहे.
कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक नीतीश सरडा यांनी सांगितले की, विविध शहरांमध्ये कार्यालयीन जागांचा विस्तार केला जात असून नवीन बहुराष्ट्रीय कंपन्यांना सेवा दिली जात आहे.
