आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    उजनी धरणावर २ हजार मेगावॅटचा फ्लोटिंग सोलर प्रकल्प

    उजनी धरणाच्या जलाशयावर २ हजार मेगावॅट क्षमतेचा फ्लोटिंग सोलर व बॅटरी स्टोरेज प्रकल्प उभारण्यात येणार असून प्रशासनाने याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २ नोव्हेंबर २०२६

    पुणे : उजनी धरण परिसरात प्रस्तावित फ्लोटिंग सोलर, बॅटरी स्टोरेज आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित डेटा सेंटर प्रकल्पाबाबत निर्माण झालेल्या शंका आणि अफवांवर प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे. या प्रकल्पासाठी १६ एप्रिल २०२६ रोजी सामंजस्य करार झाला आहे.

    प्रस्तावित प्रकल्पांतर्गत उजनी जलाशयाच्या पूर्ण संचय पातळीवरील एकूण ३३ हजार ६३० हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ३ हजार हेक्टर क्षेत्रावर फ्लोटिंग सोलर पॅनेल उभारले जातील. उर्वरित ९१ टक्के क्षेत्र खुले राहील. यातून २ हजार मेगावॅट वीजनिर्मिती अपेक्षित आहे.

    या प्रकल्पामुळे बाष्पीभवन कमी होऊन वार्षिक सुमारे १.५ टीएमसी पाण्याची बचत होईल. तसेच २ हजार ८०० कायमस्वरूपी आणि ४० हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील, असा दावा प्रशासनाने केला आहे.