MOTOTECH 2026 पुणेचे उद्घाटन संपन्न : उद्योग सहकार्य आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या सजतेवर भर
चिंचवड येथे MOTOTECH 2026 या ऑटो एक्झिबिशन्स आणि कॉन्फरन्सचे उद्घाटन पार पडले असून त्यात ई-वाहने आणि उद्योग सहकार्यावर भर देण्यात आला.
पुणे : वाहननिर्मिती क्षेत्रासाठी ऑटो ऑटोमोबाईल क्षेत्रातील विशेष परिषद आणि प्रदर्शन MOTOTECH 2026 चे चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये उद्घाटन झाले. PCMC आयुक्त व प्रशासक डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या परिषदेत एमएसएमईसाठी पायाभूत सुविधा आणि कौशल्य विकासावर भर देण्यात आला. युवकांना इलेक्ट्रिक वाहनांच्या दुरुस्तीचे प्रशिक्षण देण्यासाठी उपक्रम राबवण्याची माहिती देण्यात आली.
या प्रदर्शनात वाहन उत्पादक, पुरवठादार आणि तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
