आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    सार्वजनिक उत्सव मंडळात महिलांना अधिकार पद दिल्यास सकारात्मक बदल घडतील : संदीप खर्डेकर यांचे मत

    सार्वजनिक उत्सव मंडळांमध्ये महिलांना अधिकार पद दिल्यास गणेशोत्सव व इतर उत्सवांमध्ये सकारात्मक आणि सर्वसमावेशक बदल घडतील, असे मत संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २ नोव्हेंबर २०२६

    पुणे : सार्वजनिक उत्सव साजऱ्या करणाऱ्या मंडळांत महिलांना अधिकार पद दिल्यास सकारात्मक बदल घडतील, असे मत क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व महापुरुषांच्या जयंती उत्सवात महिलांना निर्णयाचे अधिकार देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

    अखिल सदाशिव पेठ नवरात्र उत्सव मंडळास स्पीकर आणि कपाट भेट देण्यात आले. या वेळी प्रकाशराव गायकवाड, अनिलराव यणपुरे, हर्षल शेळके व इतर मान्यवर उपस्थित होते.

    तसेच फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्सच्या वतीने विविध संस्थांना उपयुक्त वस्तूंचे वाटप करण्यात आले.