आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    शेतजमिनींचा पंचनामा पूर्ण, पीक नुकसानीचे निवेदन केंद्र सरकारला सादर करणार; मदतीची मागणी करणार

    महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील पीक नुकसानीचे ९७ टक्के पंचनामे पूर्ण झाले असून केंद्र सरकारकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २ नोव्हेंबर २०२६

    पुणे : यावर्षी अपुऱ्या पावसामुळे आणि परतीच्या पावसाने दांडी मारल्याने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले असून सुमारे ९७ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत.

    राज्य सरकारने ३५८ पैकी ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून, केंद्र सरकारकडे आर्थिक मदतीसाठी सविस्तर प्रस्ताव पाठवण्याची तयारी सुरू केली आहे.

    कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी सांगितले की, पंचनाम्यांची माहिती पडताळून केंद्र सरकारकडे मदत मागितली जाईल.