आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवून गावे जलसुरक्षित व स्वयंपूर्ण करा : दिलीप कुमार

    केंद्रीय भूमिसंसाधन विभागाचे सचिव दिलीप कुमार यांनी खेड तालुक्यातील जलसंधारण कामांची पाहणी करून पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्याचे आवाहन केले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २ नोव्हेंबर २०२६

    पुणे : पावसाचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीत मुरवणे आवश्यक आहे. त्यातूनच गावे जलसुरक्षित आणि स्वयंपूर्ण बनतील, असे प्रतिपादन केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या भूमिसंसाधन विभागाचे (DoLR) सचिव दिलीप कुमार यांनी केले. त्यांनी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वहडे, गुलाणी आणि वाफगाव येथील कामांची पाहणी केली.

    प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गावांचे रूपांतर हिवरे बाजारच्या धर्तीवर जलसुरक्षित व स्वयंपूर्ण गावांमध्ये करण्याचे आवाहन त्यांनी केले. डोंगराच्या माथ्यापासून पायथ्यापर्यंत विकसित केलेल्या विविध जलसंधारण कामांची त्यांनी पाहणी केली.

    या पाहणीदरम्यान त्यांनी ग्रामस्थ, महिला बचत गट आणि लाभार्थ्यांशी संवाद साधून प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. या वेळी राज्य जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.