पुणे मेट्रो लाईन्स-३ चे दि. ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण; ४ नोव्हेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत!
माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या २३.३ किमीच्या पुणे मेट्रो लाईन-३ चे ३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार असून ४ नोव्हेंबरपासून १७ स्थानके प्रवाशांसाठी खुली होतील.
पुणे : पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेल्या पुणे मेट्रो लाईन्स-३ (माण-हिंजवडी ते शिवाजीनगर) या मार्गिकेचे लोकार्पण ३ नोव्हेंबर २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. माण, हिंजवडी फेज-१, २, ३, वाकड चौक, मानळुंगे, विद्यापीठ चौक, आयटीआय औंध, सकाळ नगर आणि शिवाजीनगर कोर्ट या १७ स्थानकांवर प्रवास सुरू होईल.
ही पूर्ण मार्गिका २३.३ किलोमीटर लांबीची असून, आयटी पार्कला पुणे शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडण्यासाठी अत्यंत सोयीची ठरणार आहे. गर्दीच्या वेळेत दर ६ मिनिटांनी मेट्रो गाड्या उपलब्ध असतील.
