बारामती येथे ४ नोव्हेंबरला जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन, युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे आवाहन
बारामती येथील टी.सी. कॉलेजमध्ये ४ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
पुणे : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र आणि टी.सी. कॉलेज बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने ४ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, चित्रकला, पथनाट्य, कविता लेखन आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवती यात सहभागी होऊ शकतात.
विजेत्यांना पारितोषिके आणि राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अश्विनी अवतारे यांनी सांगितले.
