आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    आंदोलन तात्पुरते स्थगित परंतु कारवाईसाठी पाठपुरावा चालूच राहणार : शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे

    सांगवी येथील संविधान चौकातील स्मारक हटवल्याप्रकरणी पुकारलेले आंदोलन दिवाळीमुळे तात्पुरते स्थगित केले असले तरी कारवाई होईपर्यंत पाठपुरावा सुरुच राहील, असा इशारा शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी दिला.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २ नोव्हेंबर २०२६

    पिंपरी-चिंचवड/सांगवी : सांगवी येथील संविधान चौकातील भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिल्प हटविल्याच्या प्रकरणावरून सुरू असलेले आंदोलन दिवाळीमुळे तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे, परंतु कारवाईसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरूच राहील, असे काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी सांगितले.

    महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्मारकाचा भाग उद्ध्वस्त केल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

    जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे व मारुती भापकर यांच्या विनंतीवरून आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले आहे.