आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    आमदार शंकर जगताप यांचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात!

    चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी बार्शी, भूम-परांडा आणि कळंब तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना रेशन किट व मदत साहित्य पोहोचवले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २ नोव्हेंबर २०२६

    पिंपरी : आमदार शंकर जगताप यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी मदतीचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. बार्शी, भूम-परांडा, कळंब आणि गेवराई परिसरातील ७ हजार गरजू शेतकरी कुटुंबांना महिनाभर पुरेल असे जीवनावश्यक साहित्याचे रेशन किट आणि दिवाळीचा फराळ देण्यात येत आहे.

    या उपक्रमांतर्गत तब्बल ३० टन जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्यात येत आहे.

    शहरी भागाचे प्रतिनिधित्व करत असतानाही ग्रामीण भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची सामाजिक बांधिलकी आमदार जगताप यांनी जपली आहे.