आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    दिवाळीपूर्वी बोनस व वेतन न देणाऱ्या ठेकेदारांवर फौजदारी कारवाई करून ब्लॅकलिस्ट करण्याचा मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांचा इशारा

    पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कंत्राटी कामगारांना दिवाळीपूर्वी बोनस आणि वेतन न देणाऱ्या ठेकेदारांवर फौजदारी कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २ नोव्हेंबर २०२६

    पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागांत कार्यरत असलेल्या कंत्राटी व मानधनावरील कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस आणि वेतन देण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून कडक पावले उचलण्यात येत आहेत. दिवाळीपूर्वी कामगारांना बोनस न देणाऱ्या ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करून ब्लॅकलिस्ट करण्याचा इशारा मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी दिला आहे.

    महापालिकेच्या विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना दिवाळीपूर्वी बोनस अदा करण्याबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे.

    सोमवार सकाळपर्यंत ज्या ठेकेदारांनी बोनस व वेतन दिले नाही, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.