दुष्काळामुळे खचून जाऊ नका ; संकट काळात शासन बळीराजाच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दुष्काळामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, राज्य सरकार बळीराजाच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे आहे, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड येथे दिले.
नांदेड : दुष्काळाच्या संकटामध्ये राज्य शासन बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. दिवाळीपूर्वी ५ हजार रुपयांची मदत केली जात आहे, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
नांदेड जिल्ह्यातील वाडी बु. येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. दुष्काळामुळे शेतकर्यांना कर्ज वसुलीसाठी त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
या प्रसंगी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
