आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ३४ वातानुकूलित ई-बसचे लोकार्पण

    छत्रपती संभाजीनगर येथे ३४ वातानुकूलित ई-बसचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले असून त्यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक पर्यावरणपूरक होईल.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २ नोव्हेंबर २०२६

    छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, आरामदायी आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने ३४ वातानुकूलित इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

    या बस ९ मीटर लांबीच्या असून प्रत्येकी ३२ प्रवासी आसनांची व्यवस्था आहे. जीपीएस, आधुनिक ब्रेकिंग यंत्रणा आणि सीसीटीव्ही सुविधा या बसमध्ये उपलब्ध आहेत.

    तसेच मिटमिटा येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण आणि ई-व्हि चार्जिंग स्टेशनचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.