भाजपला धक्का देत शंभूराज देसाईंनी मैदान मारलं! सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेची बाजी
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपच्या सत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव केला.

अहिल्यानगर : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत पाटण विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विजय मिळवला. त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे सत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव करत भाजपला मोठा धक्का दिला आहे.
या निवडणुकीत एकूण १०३ ठरावांपैकी ५८ ठराव देसाई यांच्या बाजूने पडल्याने त्यांचा विजय निश्चित झाला. या विजयामुळे सातारा जिल्हा बँकेतील शंभूराज देसाई गटाची ताकद वाढली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरही याचे राजकीय परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
