राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अत्याधुनिक स्टुडियो आणि बहुउद्देशीय संगणक केंद्राचे मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने विकसित केलेल्या अत्याधुनिक ई-कंटेंट स्टुडिओ व संगणक केंद्राचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.

मुंबई : पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विषयातील संकल्पना सहजपणे समजण्यासाठी आणि स्वयंअध्ययनासाठी तंत्रशिक्षण मंडळाने (MSBTE) के-स्कीम अंतर्गत ई-ट्युटोरियल्स, ई-पुस्तके, प्रयोगशाळा हस्तपुस्तिका आणि व्हिडिओ व्याख्याने यांसारखे डिजिटल साहित्य तयार केले आहे.
मुंबई येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे स्थापन केलेल्या अत्याधुनिक स्टुडिओ आणि बहुउद्देशीय संगणक केंद्रामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा तयारी सोपी होईल आणि त्यांच्या तांत्रिक कौशल्यांमध्ये वाढ होईल, असा विश्वास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
