भारतातील प्रत्येक नागरिकाला विमा आणि पेन्शन; अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितल्या खास योजना
देशातील प्रत्येक नागरिकाला विमा आणि पेन्शनचा लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : केंद्र सरकार देशातील प्रत्येक नागरिकाला विमा आणि पेन्शनचा लाभ मिळावा, यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. गरीब कुटुंबांना आर्थिक संकटाच्या काळात आधार मिळावा, हा या योजनांचा मुख्य उद्देश असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी मुंबईतील 'अल्गोरिदम ऑफ इन्क्लुजन' कार्यक्रमात सांगितले.
पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना यांसारख्या उपक्रमांद्वारे नागरिकांना कमी हप्त्यात विमा संरक्षण उपलब्ध करून दिले जात आहे. तसेच, प्रत्येक जिल्ह्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची आणि बँकिंग व्यवस्था अधिक सक्षम करण्याची सरकारची योजना असल्याचे त्यांनी नमूद केले.
