डिजिटल जीवन प्रमाणपत्राचा लाभ घेण्याचे निवृत्तीवेतनधारकांना आवाहन, जिल्हा कोषागार कार्यालयात केंद्र शासनाच्या अवर सचिवांची भेट
राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांनी नोव्हेंबर महिन्यात डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करावे, असे आवाहन कोषागार कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

पुणे : राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी आपले निवृत्तीवेतन नियमित सुरू राहण्यासाठी 'जीवन प्रमाण' अॅप किंवा पोर्टलद्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करावे, असे आवाहन पुणे कोषागार कार्यालयाने केले आहे.
केंद्र सरकारच्या डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियानाअंतर्गत अवर सचिव दीपक गुप्ता यांनी पुणे जिल्हा कोषागार कार्यालयाला भेट देऊन आढावा घेतला. निवृत्तीवेतनधारकांनी कोषागार कार्यालयात न येता घरबसल्या मोबाईलद्वारे चेहरा प्रमाणीकरण (Face Authentication) तंत्रज्ञानाचा वापर करून जीवन प्रमाणपत्र सादर करावे, असे सांगण्यात आले.
