'गीत' आणि 'जिंद मेरी'मधून प्रेमाच्या विविध छटा
गायक आणि गीतकार तलविंदर याने 'पेंटेड फीलिंग्स' या चार गाण्यांच्या लघूसंगीत संग्रहाद्वारे प्रेमाच्या विविध भावना मांडल्या आहेत.
मुंबई : गायक व गीतकार तलविंदर याने 'पेंटेड फीलिंग्स' हा चार गाण्यांचा लघूसंगीत संग्रह श्रोत्यांसमोर सादर केला आहे. यामध्ये 'अस्से मस्से', 'मंगदा वापिस क्यूं', 'गीत' आणि 'जिंद मेरी' या गाण्यांचा समावेश आहे.
मुंबईत आयोजित विशेष कार्यक्रमात या गाण्यांचे म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आले असून प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
