उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतला बारामती शहरासह तालुक्यातील पावसाचा आढावा
बारामती शहरासह तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतला.

मुंबई : बारामतीत झालेल्या मुसळधार पावसामुळे भिगवण रोड परिसरात पाणी साचून नागरिकांना त्रास सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी उपविभागीय अधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला.
साचलेल्या पाण्याचा त्वरित निचरा करावा, आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी आणि नागरिकांना मदत उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
