पोटच्या दोन मुलांचा गळा आवळणाऱ्या आईला दुहेरी जन्मठेप! पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय
घरगुती वादातून दोन लहान मुलांचा गळा आवळून खून करणाऱ्या आईला पुणे सत्र न्यायालयाने दुहेरी जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली.

पुणे : पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जानेवारी २०२२ मध्ये तीन वर्षांची मुलगी आणि दोन वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून करणाऱ्या पूजा संजय सोळंकी (वय २८, रा. मेरीखेडा, जि. खंडवा, मध्य प्रदेश) हिला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. भन्साळी यांनी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
पतीसोबत झालेल्या वादातून तिने मुलांची हत्या केली होती. या प्रकरणात न्यायालयाने प्रत्यक्ष पुरावे व साक्षीदारांच्या आधारे दोषी ठरवून दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
