हिंजवडी-माण-मारुंजी परिसरातील सहा डीपी रस्त्यांच्या भूसंपादनाला गति द्या
हिंजवडी-माण-मारुंजी परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सहा विकास आराखडा (डीपी) रस्त्यांचे भूसंपादन एका महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
पुणे : हिंजवडी-माण-मारुंजी परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि पायाभूत सुविधांच्या कामांबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आढावा घेतला. सहा विकास आराखडा (डीपी) रस्त्यांच्या भूसंपादनाला गती देऊन टीडीआर प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
डिसेंबर २०२६ पासून रस्त्यांच्या विकासाची कामे प्रत्यक्ष सुरू होतील, असे नियोजन करण्याचे सांगण्यात आले. याशिवाय वीज पुरवठा, जलनिस्सारण, कचरा व्यवस्थापन आणि रस्ता सुरक्षेबाबत विविध विभागांना समन्वय ठेवून काम करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
