आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पुणे महापालिकेच्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसह कंत्राटी कामगारांना 'एवढा' मिळणार दिवाळी बोनस!

    पुणे महापालिकेतील १८ हजार कर्मचारी व ११ हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदान (दिवाळी बोनस) देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · ३ नोव्हेंबर २०२६

    पुणे : पुणे महापालिकेतील नियमित कर्मचाऱ्यांना वेतनाच्या ८.३३ टक्के दराने सानुग्रह अनुदान आणि २७ हजार रुपये अतिरिक्त अनुदान मिळणार आहे. स्थायी समितीच्या निर्णयानुसार महापालिका कर्मचाऱ्यांच्या बोनसमध्ये यंदा दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

    याशिवाय कंत्राटी कामगारांना प्रत्येकी १० हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे सुमारे ९९ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पालिकेवर पडणार आहे.