पक्की अनुज्ञप्ती वाहन चाचणी आता कदमवाकवस्ती येथील पालखी तळावर
उरुळी कांचन परिसरातील पक्की अनुज्ञप्ती वाहन चाचणी आता कदमवाकवस्ती येथील पालखी तळावर होणार आहे.
पुणे : उरुळी कांचन येथील पीएमटी बसस्थानकाजवळ होणारी पक्की अनुज्ञप्ती वाहन चाचणी ४ नोव्हेंबर ते २८ डिसेंबर २०२६ या कालावधीत कदमवाकवस्ती येथील पालखी तळावर आयोजित केली जाणार आहे.
अर्जदारांनी ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करून या नवीन ठिकाणी चाचणीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
