मिशन लक्ष्यवेध अंतर्गत कुस्तीपटूंची निवड चाचणी ४ नोव्हेंबरला
'मिशन लक्ष्यवेध' योजनेअंतर्गत विभागीय कुस्ती निवड चाचणी ४ नोव्हेंबर रोजी बालेवाडी क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली आहे.
पुणे : क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे 'मिशन लक्ष्यवेध' योजनेअंतर्गत २५ वर्षांखालील खेळाडूंसाठी कुस्ती निवड चाचणी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे.
पात्र खेळाडूंनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन क्रीडा उपसंचालक युवराज नाईक यांनी केले आहे.
