पुण्यातील नामांकित बिझनेसमनच्या सुनेनं स्वतःला संपवलं, नातेवाईकांचा गंभीर आरोप; झांबरे पॅलेसची तोडफोड
मुकुंदनगर येथील व्यावसायिक कुटुंबातील सून पायल झांबरे यांनी आत्महत्या केल्याने संतापलेल्या माहेरच्या नातेवाईकांनी झांबरे पॅलेसवर हल्ला करत तोडफोड केली.

पुणे : पुण्यातील मुकुंदनगर परिसरात विवाहित महिला पायल अक्षय झांबरे यांनी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केली. या घटनेनंतर माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर हुंडा आणि शारीरिक-मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
संतापलेल्या नातेवाईकांनी झांबरे पॅलेसच्या घरावर हल्ला करून मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे.
