मुलाला सोबत नेलं नाही, तर तुम्हाला दुसरं लग्न करणं कठीण जाईल; नवऱ्याला शेवटचं भावनिक पत्र, पुण्यातील विवाहितेने लेकरासह मरण कवटाळलं
पिंपरी चिंचवडमधील ३३ वर्षीय विवाहित महिला एकता भांगड यांनी आपल्या ६ वर्षांच्या मुलासह १८ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

पुणे : पिंपरी चिंचवड येथील 'सिम्रेग्र पार्क' मधील रहिवासी एकता मनोज भांगड (वय ३३) यांनी आपल्या ६ वर्षांच्या मुलासह इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले. मृत्यूपूर्वी त्यांनी पतीसाठी एक भावनिक चिठ्ठी लिहून ठेवली होती.
एकता या मणक्याच्या आजाराने त्रस्त होत्या. आजारपण आणि कौटुंबिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
