माजी मंत्री स्व.रामकृष्ण मोरे यांच्या पुण्यतिथीकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे दुर्लक्ष;काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी केला निषेध व्यक्त!
माजी शिक्षण मंत्री स्व. प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या पुण्यतिथीला अभिवादन न केल्याबद्दल काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी पिंपरी महापालिकेचा निषेध केला.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणारे माजी मंत्री स्व. प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेकडून कोणतेही अभिवादन करण्यात आले नाही.
या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवत काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
