पिंपरीतील शगुन चौकात पूजेच्या साहित्याच्या दुकानाला भीषण आग; दोन अग्निशमन कर्मचारी जखमी
पिंपरीतील शगुन चौकातील एका पूजेच्या साहित्याच्या दुकानाला मध्यरात्री भीषण आग लागून दुकान खाक झाले.

पिंपरी : पिंपरी येथील शगुन चौक परिसरातील पूजेच्या साहित्याच्या दुकानाला मध्यरात्री १२:४९ च्या सुमारास अचानक भीषण आग लागली. आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून मोठे नुकसान झाले आहे.
आग विझवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाचे दोन जवान किरकोळ जखमी झाले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
