महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात गुंतवणुकीच्या व्यापक संधी; गुंतवणुकदारांसाठी राज्य सज्ज : मंत्री नितेश राणे
महाराष्ट्रातील सागरी क्षेत्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध असून राज्य शासन गुंतवणूकदारांसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
मुंबई : 'इंडिया कन्फर्न्स अँड एक्स्पो' चे उद्घाटन करताना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या सागरी अर्थव्यवस्थेवर भाष्य केले. राज्यातील बंदरे, शिपिंग आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात ७६ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत.
किनारपट्टीच्या विकासासह सागरी व्यापाराला चालना देण्यासाठी नवीन धोरणे राबवली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
