बारामतीत पाच वर्षांत प्रथमच एवढी मोठी पाऊसतूट; ३६ हजार हेक्टर खरीप संकटात
बारामती तालुक्यात २०२६ मध्ये आतापर्यंत केवळ १२३.५ मिमी म्हणजे २४.३१ टक्के पाऊस झाला असून ३६ हजार ३७० हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

बारामती : पाण्याचे नियोजन, कालव्याची आवर्तने आणि सिंचन योजनांची चर्चा वर्षानुवर्षे सुरू असताना बारामती तालुक्यावर यंदा पुन्हा दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. २०२६ मध्ये आतापर्यंत तालुक्यात केवळ १२३.५ मिमी म्हणजे २४.३१ टक्के पाऊस झाला. त्याचा थेट फटका खरीप हंगामाला बसला असून, तब्बल ३६ हजार ३७० हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
बारामतीच्या जिरायत पट्ट्यातील बाजरी पाण्याअभावी जळून गेली आहे.
