भटक्या-विमुक्त नागरिकांसाठी विशेष हक्क व प्रमाणपत्र अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता' सेवा पंधरवड्यानिमित्त पणदरे येथे आयोजित 'भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान' या विशेष मोहिमेला बारामती तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

बारामती : 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता' सेवा पंधरवड्यानिमित्त राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीतील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पणदरे येथे आयोजित करण्यात आलेल्या 'भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान' या विशेष मोहिमेला बारामती तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिरामध्ये विविध जातींतील ४७ लाभार्थ्यांनी जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज दाखल केले, तर ७ लाभार्थ्यांनी नवीन शिधापत्रिका मिळण्यासाठी अर्ज सादर केले. अशा प्रकारे एकूण ६१ लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवांचा लाभ मिळाला, अशी माहिती तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी कळविली आहे.
