आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    कोल्हापूरच्या ब्रँडिंगसाठी कोल्हापूर महोत्सवासारखे उपक्रम राबवा : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    कोल्हापूरचे समग्र, एकात्मिक ब्रँडिंग करण्यासाठी कोल्हापूर महोत्सवासारखे उपक्रम राबवावेत, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

    ३० सप्टेंबर २०२६

    कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे, विपुल निसर्ग संपदा लाभलेली आहे, जिल्ह्याला धार्मिक तीर्थस्थळे, क्रीडा, व्यापार, उद्योग यांची गौरवी परंपरा आहे. कोल्हापूरचे समग्र, एकात्मिक ब्रँडिंग करण्यासाठी कोल्हापूर महोत्सवासारखे उपक्रम राबवावेत, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

    राज्यपाल जिष्णु देव वर्मा हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील प्रमुख विकास प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. नशा मुक्त पिढी घडविणे हे आज फार मोठे आव्हान आहे, असेही ते म्हणाले.