आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे समिश्र वृत्तांत

    लाडक्या ठेकेदाराला रस्त्याचे काम न दिल्याने थेट आयुक्तांनाच ॲट्रॉसिटीची धमकी

    आपल्या ठेकेदाराला रस्त्याचे ९० कोटी रुपयांचे काम न दिल्यामुळे शहरातील सत्ताधारी आमदाराने महापालिका आयुक्तांनाच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार पुढे आला आहे.

    ३० सप्टेंबर २०२६

    पुणे : आपल्या ठेकेदाराला रस्त्याचे ९० कोटी रुपयांचे काम न दिल्यामुळे शहरातील सत्ताधारी आमदाराने चक्क महापालिका आयुक्तांनाच 'ॲट्रॉसिटी'चा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. दुसरीकडे, आयुक्तांनी या आमदारांच्या दबावाला न जुमानता नियमानुसार पात्र ठेकेदाराला काम देण्याचा निर्णय घेतल्याने महापालिकेचे सुमारे नऊ कोटी रुपये वाचणार आहेत.

    महापालिकेने प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) ते बंडगार्डन पूल या वर्दळीच्या रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून मुळा-मुठा नदीच्या कडेने वेलस्ली रस्ता प्रस्तावित केला आहे. हा रस्ता दोन किमी लांब आणि १७ मीटर रुंद असेल.