आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी २३ ऑक्टोबरला मतदान

    महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. एकही पात्र मतदार वंचित राहू नये, असे निर्देश विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिले.

    ३० सप्टेंबर २०२६

    पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदार संघ आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही आणि सर्व मतदारांना मतदानाचा हक्क नियमानुसार बजावता यावा, याकरिता विविध माध्यमांद्वारे व्यापक स्वरुपात मतदार जनजागृती करण्यात यावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिले.

    विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित समन्वय अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या.