सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत भित्तीपत्रक व पोस्टर निर्मिती स्पर्धा उत्साहात
आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात 'सेवा संकल्प अभियान २०२६' अंतर्गत भित्तीपत्रक व पोस्टर निर्मिती स्पर्धा उत्साहात पार पडली.

पुणे : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह, घोडेगाव येथे 'सेवा संकल्प अभियान २०२६' अंतर्गत भित्तीपत्रक व पोस्टर निर्मिती स्पर्धेच्या माध्यमातून सेवा, सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम घडविणारा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी गणेश इबनाते यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत वसतिगृहातील सर्व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
