रियाध विमानतळावरील हल्ल्यात ११ भारतीय जखमी; सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाची 'एक्स'वर माहिती
रियाध विमानतळावर काल झालेल्या हल्ल्यात १२ जणांचा मृत्यू झाला असून ३०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये ११ भारतीयांचा समावेश असल्याची माहिती सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाने दिली आहे.

रियाध येथील भारतीय दूतावास काल रियाध विमानतळावर झालेल्या हल्ल्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. या हल्ल्यात दुर्दैवाने १२ जणांचा मृत्यू झाला असून ३०० हून अधिक जण जखमी झाले आहेत, अशी माहिती सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाने 'एक्स' (X) वर दिली आहे.
हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये ११ भारतीय नागरिकांचा समावेश असल्याचे समजले आहे. भारतीय दूतावास याप्रकरणी स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे 'इंडिया इन सौदी अरेबिया' यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
